'बापट ते बापट '
एक विरोधाभास!
खासदार गिरीश बापट (भारतीय जनता पार्टी ), सन. 1983 ते 1997 पुणे महानरपालिकेचे नगरसेवक आणि काही अल्प कालावधी साठी स्थायी समितीचे अध्यक्ष व 1995 मध्ये ते प्रथमच आमदार आणि साल 2019 मध्ये 17व्या लोकसभेचे खासदार म्हणून ते निवडून आले.'भारतीय जनता पार्टी 'चे पुणे जिल्ह्यातील एक विश्वसनीय नाव म्हणून ते मरणोत्तर झळकले.
इतिहास :
गिरीश बापट यांचा जन्म 3सप्टेंबर 1950 मध्ये 'तळेगाव दाभाडे 'जिल्हा पुणे येथे झाला. "गिरीश भालचंद्र बापट "हे त्यांचे पूर्ण नाव ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील सावंगी मग्रापूर या गावचे रहिवाशी होते. हि झाली गिरीश बापटांविषयी थोडक्यात माहिती.
पुणे महानगरपालिका इतिहास :
(PMC) म्हणजेच पुणे म्यूँसिपल कॉर्पोरेशन ची स्थापना 15 फेब्रुवारी 1950 रोजी करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या नोंदी नुसार PMC हि 'अ 'वर्ग महानगरपालिका आहे. पुणे शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, कर, तसेच नागरी सुविधांचे प्रशासन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन करते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका :
( PCMC) म्हणजेच पिंपरी चिंचवड म्यूँसिपल कॉर्पोरेशन ची स्थापना 11ऑक्टोबर 1982 मध्ये झाली. त्यानंतर औद्योगिक विकास कामांवर भर दिला जातो. 'पिंपरी चिंचवड महानगरपालिका' झाल्यावर आसपासच्या भागाचा नियोजित नागरी विकास झपाट्याने करण्यात येतो. 1982 मध्ये स्थापन झालेली म्हणजेच 'पुणे महानगरपालिके' पेक्षा बत्तीस वर्ष लहान असलेली PCMC औद्योगिक विकासा बरोबरच आधुनिक नागरी सुविधानसाठी देखील आशिया खंडात नावाजलेली आहे. पिंपरी चिंचवड नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झल्यानंतर तेथील नेते मंडळींनी देखील शहराच्या विकासाकडे अधिक लक्ष्य दिले आणि म्हणूनच PCMC हे आशिया खंडातील सर्वात विकसित व मोठी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.
ज्या पुणे शहरावर गिरीश बापट यांनी 35 ते 40 वर्षे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ते आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून राज्य केले त्या पुणे शहराचा विकास PCMC प्रमाणे का नाही झाला? पुणे शहरातील पेठा गेली कित्येक वर्षे आहे तशाच आहेत, रस्ते रुंदीकरण नाही, पार्किंगच्या सुविधा नाहीत, वाहतूक कोंडी, मूलभूत गर्जेंचा अभाव, बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय, घाणीचे साम्राज्य, गुन्हेगारी साम्राज्य, इत्यादी जसे च्या तसे आहेत. मग गिरीश बापटांनी केले तरी काय?
11सप्टेंबर 2015 विद्यार्थी हक्क परिषद बालगंधर्व
पुणे :
गिरीश बापट हे पुणे शहरात 1983 पासून तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार, एक वेळा खासदार, व नंतर 2015 मध्ये ते पुणे शहराचे पालकमंत्री असताना 11 सप्टेंबर 2015 रोजी 'बालगंधर्व रंगमंदिर पुणे 'येथे 'विद्यार्थी हक्क परिषद 2015'चे आयोजन केले होते.त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी गिरीश बापट यांना मंचावर प्रथम संधी देण्यात आली. आम्हाला अपेक्षा होती की, आता बापट साहेब विद्यार्त्यांसाठी शिक्षणात नवनवीन उपक्रम, रोजगारीसाठी संधी, शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना विकसित होण्यासाठी नवीन योजना, विद्यार्थ्यांना व्यवसाय start up साठी कर्ज सुविधा, पुणे शहराच्या विकास कामांसाठी नवीन कल्पना, अशा विविध विषयांवर चर्चा तसेच आश्वासने देतील.
अपेक्षा भंग :
विद्यार्थ्यांना संबोधित असताना पालकमंत्र्यांनी भाषण सुरु केले, गिरीश बापट म्हणाले, "मोबाईल मध्ये नेट ऑन करून तुम्ही काय पाहतात? हे मला माहित आहे. जे तुम्ही पाहता ते मी पण पाहतो. हे पान जरी पिकले असले तरी देठ अजून हिरवा आहे."आणि मी स्वतःला च म्हणालो, "काय बिंडोक माणूस आहे हा."
होय हे 100%अश्लीलच आहे कारण आजच्या काळात अय्याशी, भोगविलासी, मोजमज्जा करणारी धनाढ्या मंडळी, डान्स बार, पब, डिस्को बार, रेव्ह पार्ट्या अशा विविध ठिकाणी जातात व मुलींना पैसा,दारूच्या नशेचे प्रलोभण देऊन त्यांना नाचवून भोग आनंद घेतात.परंतु पूर्वीच्या काळात अशा सुविधा नव्हत्या. त्याकाळी ' तमाशा व लावणी 'अशा प्रकारच्या बैठका घेतल्या जात असत. लावणी सम्राज्ञी 'सुरेखा पुणेकर '
यांनी, 'पिकल्या पानाचा देठ की, ओ हिरवा 'हि लावणी गायली आहे.
पिकल्या पानाचा देठ कि ओ हिरवा :
हया लावणीचे चित्रीकरण मुख्यता: 60 ते 65 वर्षे वयोवृद्ध धनाढ्य लोकांवर केले गेले आहे. जे लोक तरुण मुलींची बैठक बसवतात म्हणजेच त्या मुलींना आपल्या इशाऱ्यावर नाचायला लावतात. ते वयोवृद्ध मंडळी त्याचा अश्लील आनंद घेतात. अशा भोगविलासी लोकांना उद्देशून हि लावणी लिहिण्यात आली. याचा अर्थ असा की, पान कितीही पिकले असले तरी त्याचा देठ हिरवाच असतो. म्हणजेच हया भोगविलासी लोकांचे वय कितीही वाढले असले तरीही ह्यांचा माज काही कमी होत नाही.
गिरीश बापट यांच्या मते तरुण पिढी ही रात्री मोबाईलवर नेट ऑन करून Porn Movie पाहतात. मग विद्यार्थ्यांना ते सांगतात की, तुमच्या प्रमाणेच मी सुद्धा नेट ऑन करून Porn Movie पाहतो व माझे वय जरी 65 वर्षे असले तरी माझे देठ अजून हिरवेच आहे. याचाच अर्थ तुमच्या प्रमाणेच sex साठी मी देखील उत्सुक असतो.
संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वरांच्या लहान बहीण संत मुक्ताबाई यांनी अनेक वर्षे योगसिद्धी, तपश्चर्या, केलेल्या संत चांगदेवास उद्देशून त्या म्हणाल्या होत्या, "इतकी वर्षे तपश्चर्या, योगसाधना, आणि सिद्धी मिळवूनही तूझ्या अंतःकरणात खरे आत्मज्ञान निर्माण झाले नाही. अरे चांगदेवा तू कोरा ते कोराच राहिलास."
म्हणजेच तपश्चर्या करण्या आधीही तू बुद्धीहीनच होतास आणि इतकी वर्ष तपश्चर्या योग साधना आणि सिद्धी मिळूनही तू बुद्धिहीनच आहेस. त्याचप्रमाणे पालकमंत्री गिरीश बापट हे पंधरा वर्षे नगरसेवक,25 वर्ष आमदार, पाच वर्षे खासदार, व पालकमंत्री पुणे महानगरपालिका चे स्थायी समिती अध्यक्ष राहून देखील विद्यार्थ्यांना संबोधित कसे करावे याचे देखील सर्वसाधारण ज्ञान नाही म्हणजेच संत चांगदेवाप्रमाणेच कोरे ते कोरेच राहिले.
विदयानंद / विदयाधर बापट :
एक वैचारिक बुद्धिमत्तेची क्रांती
परिचय:
विद्यानंद सुहास बापट हे त्यांचे पूर्ण नाव ते मूळचे रत्नागिरी (कोकण ) जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील नारायण पेठ पुणे येथे राहतात. मुंबई विद्यापीठातून बी. कॉम.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. बापट साहेबांना वाचनाची खूप आवड आहे. ते अभ्यासू वृत्तीचे असून अत्यंत बुद्धिवंत विचारसरणीचे व्यक्तिमत्व आहे.
सामाजिक उत्सव कायद्याची पायमल्ली :
विद्यानंद बापट साहेब यांच्या सध्याच्या सार्वजनिक कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान आणि ध्वनी प्रदूषण,वाहतूक कोंडी तसेच आरोग्याचा प्रश्न आहे.त्यांच्या मते धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सवांना विरोध करणे हा माझा उद्देश नाही. मात्र उत्सव साजरे करताना इतर नागरिकांच्या शांततेचा सुव्यवस्थेचा तसेच आरोग्याचा विचार केला पाहिजे अशी माझी भूमिका आहे.
विद्यानंद बापट यांचे विशेष कार्य :
- सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आवाज.
- गणेश उत्सवात जागोजागी बांधण्यात येणाऱ्या मंडप व मिरवणुकीमुळे होणाऱ्या वाहतूक अडथळ्यांवर प्रश्न.
- सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषणावर रोख.
- अनाधिकृत लाऊड स्पीकरच्या वापरावर प्रश्नचिन्ह.
- सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे व लेझर लाईट ला विरोध.
- पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूकता.
बापट साहेबांचे विचार तसेच कार्य वंदनीय आहेच.कारण आज कोणताही सामाजिक उत्सव असो डीजे लेझर लाईट मिरवणूक बॅनरबाजी ही असतेच परंतु त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण वाहतूक कोंडी तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्याचा कोणीही विचार करीत नाही पुणे महानगरपालिकेचे महापौर देखील सर्वसामान्यांचे आरोग्यविषयक नागरी सुविधांचे प्रश्न ऐरणीवर ठेवून धर्मांध कार्यक्रमांना प्रोत्साहन देतात.फिचर imag
आज पुणे शहरात अल्प कालावधीतच बापट साहेब सर्वच न्यूज चैनल तसेच वृत्तपत्रांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर झळकले आहेत. बापट साहेब सर्वसामान्यांच्या आरोग्याबाबत तसेच नागरी सुविधांसाठी एकटेच निर्भीडपणे आवाज उठवीत आहेत. आणि प्रत्येक नागरिकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचे महत्व पटवून सांगत आहेत. प्रत्येक न्यूज चैनल वृत्तपत्रे त्यांची मुलाखत घेत आहेत.कोणत्याही न्यूज अँकर ने विचारलेल्या जटिल प्रश्नाचे उत्तर ते अगदी सहजपणे व कायद्याच्या चौकटीत राहून न चुकता देत आहेत. त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याने व साधेपणाने तसेच मराठी व इंग्रजी या भाषेंवर असलेल्या प्रभुत्वाद्वारे आपला ठसा पुणे शहरात उमटवला आहे.