Friday, 16 October 2026 🕐 06:50:20 AM | Pune, Maharashtra
BREAKING NEWS
● मुंबई: पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी ● अमेरिका-चीन व्यापार चर्चा सकारात्मक मुद्दांवर ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही ● मुंबई: पावसामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी ● अमेरिका-चीन व्यापार चर्चा सकारात्मक मुद्दांवर ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● पत्रकारिता :लोकशाहीचा चौथा स्तंभ ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही ● “न्यायाचा वेग : सर्वांसाठी समान का नाही
All Breaking News →
रात्रीचा मोड (Dark Mode)
Law

दौंड शहर एक मटका व जुगारी चा अड्डा!

दौंड शहरातील मध्य भागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोरच मटका, सोरट, व जुगारीचा अड्डा.

दौंड शहर एक मटका व जुगारी चा अड्डा!
दौंड शहरातील मध्य भागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोरच मटका, सोरट, व जुगारीचा अड्डा.
1 मिनिटे वाचन
अक्षर आकार:

                'दौंड शहर'
         एक मटका व जुगारी चा अड्डा!

दौंड शहरातील मध्य भागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोरच मटका, सोरट, व जुगारीचा अड्डा.

दौंड शहरातील विद्येचं मंदिर म्हणून नावाजलेले 'भिमथडी शिक्षण संस्थेचे 'शेठ जोतिप्रसाद विद्यालय व शहरातील कापड उद्योगातील सर्वात प्रसिद्ध 'प्रकाश क्लोथ स्टोअर 'या दोन्ही संस्थांनाच्या बिल्डिंग मधील जो भाग आहे ती एक दौंड नगरपरिषदेने शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी केलेली मोठी गटार आहे. परंतु शहरातीलच काही समाज कंटाकांनी, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांनी राजकीय नेत्यांचा पाठिंबा घेऊन त्या गटारीवर अनधिकृत कच्चे तसेच पक्के बांधकाम करून त्यामध्ये बिनधास्तपणे अवैध धंदे चालविले जातात.
Satya News Photo



दौंड शहराचे पोलीस इन्स्पेक्टर 'सिंघम'श्री शेडगे साहेब 

दौंड शराचे पोलीस इन्स्पेक्टर श्री शेडगे साहेब हे अवैध धंदे वाल्यांचा तसेच शहरामध्ये अवैध वसुली व दादागिरी करणाऱ्यांचा कर्दनकाळ 'सिंघम'म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सिंघम साहेबांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी दौंड शहरातील अवैध धंदे पूर्ण पणे मोडकळीस आणले होते.
तरीसुद्धा काही राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे   दौंड नगरपरिषद हद्दीतील अति गजबजलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातच शेठ जोतिप्रसाद विद्यालयाला लागूनच असलेल्या गटारीवरच अनधिकृत बांधकाम करून बेकायदेशीर मटका, सोरट व जुगारीचा अड्डा बिनधास्तपणे चालवीला जात आहे.

विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरनिवार!

भिमथडी शिक्षण संस्थेचे शेट जोतिप्रसाद विद्यालय हे संस्थेचे श्री बाबुशेठ बोरीकर यांच्या कालखंडातील एक  नावाजलेले विद्यालय म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्यावेळी शिक्षणात कोणतीही तडजोड असत न्हवती.शहरातील मध्य भागी असलेले शेठ जोतिप्रसाद विद्यालय हे शिक्षणासाठी कडक विद्यालय म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळेच दौंड शहर तसेच शहराच्या आजूबाजूनच्या खेड्या पाड्यातील विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी हया विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज येत असतात. परंतु विदयालयाला लागूनच असलेल्या अवैध धंदे व ते चालवीणारे गुंड प्रवृतीचे लोक आणि तिथे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लंपट लोकांच्या आवाजाविणे विद्यार्थी तसेच विध्यार्थिनींना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनधिकृत बांधकांमावर दौंड नगरपरिषद गप्प का?

दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माननीय दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांच्या नगरपरिषद कार्यालयापासून अगदी 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावरील या सार्वजनिक गटारीवर कच्ची व पक्की बांधकाम करून हे बेकायदेशीर उद्योगधंदे चालविले जात आहेत. हे सर्व प्रशासनाच्या डोळ्या देखत घडत असतानाही नगरपरिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यंत्रणा याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

अहवान 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रकाश क्लोथ स्टोअर हा परिसर शहराचा मुख्य व्यापारी भाग आहे. येथे उघडपणे चालणाऱ्या मटका, सोरट व जुगार अड्डयामुळे येथे येणाऱ्या महिलांना देखील नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक गुंडाच्या व काही राजकीय लोकांच्या भीतीपोटी कोणीही सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही. तरी दौंड नगरपरिषद व दौंड पोलिसांनी यामध्ये जातीने लक्ष घालून अशा बेकायदेशीर धंद्यावर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा आजनाऊद्या दौंड शहराच्या नागरिकांच्या उद्रेकला सामोरे जावे लागणार.