दर्शकांना नमस्कार,
मी सुनिल ज्ञानदेव शिंदे M. A. Journalist सुरुवातीपासूनच पत्रकारिता हा माझा आवडत विषय, पत्रकारितेमध्ये MAMC(Master of Aarts in Mass Comunication )ही डिग्री मी 'टिळक महाराष्ट्र विद्यापीठ 'पुणे, गुलटेकडी येथून जिद्दीने, चिकाटीने अभ्यास करून मिळविली आहे.
इतिहास :
पत्रकारितेची सुरुवात ही पूर्वीपासूनच माणसाची माहिती मिळविण्याची आणि ती माहिती इतरांपर्यंत पोहचविण्याच्या मूलभूत गरजेतून झाली असावी, कारण पूर्वीचे राजे महाराजे देखील एखादी योजना अथवा कायदेशीर माहिती जनतेसमोर पोहचविण्यासाठी
आपल्या दरबारात काम करणाऱ्या एका विशिष्ट व्यक्तीला दवंडी देण्यास सांगत असत व ती व्यक्ती दरबारातून मिळालेली माहिती जनतेपर्यंत पोहचवीत असत.कालांतराने पत्रकारितेची सुरुवात ही खऱ्या अर्थाने पंधराव्या शतकात झाली कारण जोहान्स गुटेनंबर्ग या शास्त्रज्ञाने वृत्तपत्र छापखाण्याचा शोध लावला. अठराव्या शतकानंतर वृत्तपत्रे लोकशाहीचा मुख्य स्तंभ म्हणून संबोधिले जाऊ लागले.
6 जानेवारी 1832 रोजी बालशास्त्री जांभेकरांनी 'दर्पण 'हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करतात.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. परंतु प्रत्येक भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरोधात बंड व असंतोषाची भावना जागृत करण्याचे कार्य मुख्यतः वृत्तपत्रांनीच केले आहे. लोकमान्य टिळकांनी 1881 साली पुण्यामध्ये' केसरी '(मराठी )आणि 'मराठा '(इंग्रजी )सुरु केली.त्यावेळी इंग्रजांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व भारतीयांच्या मनात इंग्रजविरोधात असंतोषची भावना निर्माण करण्यासाठीच टिळकांनी वृत्तपत्रांच्या आधारेच "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"असा थेट सवाल विचारून इंग्रज सरकाला हदरवून सोडले होते.त्यावेळी त्यांच्यासाठी पत्रकारिता हेच असंतोष व्यक्त करण्याचे साधन होते. तसेच 1920 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 'मुकनायक', 'बहिषकृतभारत','जनता','प्रबुद्ध भारत'या वृत्तपत्रांमधून सामाजिक क्रांतीचा संदेश देण्यास सुरुवात केली.

लोकमान्य टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधर बळवंत टिळक (श्रीधरपंत टिळक )हयांनी देखील वृत्तपत्रांमधूनच सामाजिक विषमतेचे बंड पुकारले. तसेच केसरी वाड्याच्या आणि वृत्तपत्रांच्या चौकटीत राहूनच सामाजिक समता व वंचिताच्या हक्कासाठी लेख लिहिले. त्यांनी आपल्या लेखातून स्पष्ट केले की,"राजकीय स्वातंत्र्याइतकीच सामाजिक समतासुद्धा देशाला अखंड ठेवण्यासाठी अनिवार्य आहे."म्हणजेच पत्रकारितेच्या माध्यमातूनच अशा अनेक महान तत्वज्ञानी लोकांनी भारताला अखंड ठेवण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे.
उद्देश :
पत्रकारितेचा मुख्य उद्देश म्हणजेच देशहीत तसेच शोषितांचा व वंचिताचा आवाज बनणे. जनतेला सत्य, अचूक आणि ताज्या घडामोडिंची माहिती देणे. शासनाच्या कामांचा पाठपुरावा करून तो तपशील जनतेसमोर वृत्तपत्रांच्या तसेच रेडिओ, टी. व्ही. वरील बातम्या या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविणे.
आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे.पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ सध्या नाजूक परस्थितीत आहे. भांडवलशाही आणि राजकीय दबावामुळे पत्रकारितेची नैतिकता घसरली आहे.माध्यमे टी. आर. पी. साठी पत्रकारितेचे व्यापारीकरण करीत आहेत. सत्यता न तपासताच अनेक वेळा फेक न्यूज चालविल्या जातात उहाहरणार्थ (2000/-च्या नोटे मध्ये नॅनो चिप ).
शिक्षण :
पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना आमच्या प्रोफेसर सौ. अनुजा पालकर यांनी आम्हाला पत्रकारितेचा अर्थ आणि कर्तव्य एकदम सोप्या शब्दांत सांगितले. त्यांच्या मते पत्रकारिता म्हणजे,"तुम्ही काळ्याला काळा म्हणा आणि गोर्याला गोरा म्हणा so simple . "म्हणजेच जनतेसमोर नेहमी निष्पक्षपणे सत्य मांडा.होय मॅम म्हणूनच जनतेसमोर सत्य मांडण्यासाठी 100%सत्य. न्यूज या न्यूज पोर्टलच्या माध्यमातूम मी जनतेसमोर कर्तव्यदक्ष पत्रकार कसा असावा व पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ का म्हणतात हे दाखवून देणार आहे.